सोलापूर – वडाळा येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले 200 विद्यार्थी स्वावलंबी जीवन जगत आहेत,हे पाहून ज्या उद्देशाने ही शाळा सुरू केली,तो उद्देश सार्थक झाला असल्याचे भावनिक उदगार प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय पुरी यांनी काढले.
वडाळा येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा गुरुवारी घेण्यात आला.जिल्हाध्यक्ष पुरी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले.त्यावेळी ते बोलत होते.मुख्याध्यापक संजयकुमार वाघमारे अध्यक्षस्थानी होते.वसतिगृह अधिक्षक अजित परबत, विशेष शिक्षक श्रीरंग पाचकवडे, राहुल गुंड, बालाजी बनसोडे, अरुण दराडे,उमा फलमारे,कला शिक्षक सचिन भोसले, बळीराम शिंदे, निरंजन मुरुगकर यावेळी उपस्थित होते.
पुरी पुढे म्हणाले , प्रहारचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांच्यामुळे राज्यातील दिव्यांगांना न्याय मिळाला.आता तुकाराम मुंढे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी सचिव म्हणून लाभले.त्यामुळे आता दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाला चांगली गती आणि योग्य दिशा मिळेल.
माऊली मतिमंद निवासी विद्यालयातून बाहेर पडलेले 200 विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात दाखल झाले असून ते कुटुंबाचे ओझे म्हणून न राहता कुटुंबाचा आधार बनले असल्याचे सांगून मुख्याध्यापक वाघमारे म्हणाले, सूक्ष्म नियोजन करून शाळेचे कामकाज सुरू असून शिक्षण, स्वावलंबन व पुनर्वसन या त्रिसूत्रीचा वापर करून ही शाळा पथदर्शी कशी होईल,यावर
आमचा भर राहील.राष्ट्रीय न्यास समितीचे सदस्य दत्तात्रय मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.
वडाळा येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शासनाच्या अर्थसहाय्य योजनेच्या मंजुरीचे आदेश वाटप करताना प्रहारचे जिल्हा अध्यक्ष विजय पुरी मुख्याध्यापक संजयकुमार वाघमारे, अधिक्षक अजित परबत, श्रीरंग पाचकवडे, अरुण दराडे,उमा फलमारे