सोलापूर – येथील सुरवसे हायस्कूलमध्ये रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी २००४-०५ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील सुवर्णकाळाला उजाळा दिला.
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सुरवसे हायस्कूल माझी मुख्याध्यापक श्री. राजशेखर लक्ष्मीश्वर सर , विद्यमान मुख्याध्यापिका गीतांजली पिरगोंडे, माजी मुख्याध्यापिका दीपाली इंगोले मॅडम माझी शिक्षक, शेटे सर, घाडगे सर,प्याटी सर, बसम्मे मॅडम, अपर्णा रास्ते मॅडम, सुजाता कांबळे, इ. उपस्थित मान्यवराचा विद्यार्थ्यांनकडून मान सन्मानकरण्यात आला. तसेच गुरुजणांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी , अध्यक्ष प्रविण हिरेमठ, ताकमोगे बंधू, प्रविण सरवदे, दीपक बेळळे,महेश पाटील, शिवराज बोरुटे, विरेश इंडे,शिल्पा म्हेत्रे, पुष्पा चौगुले यांनी परिश्रम घेतले. प्रीती कनाळ हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले..संदीप पाचंगे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले.



















