Day: January 21, 2026

मुख्यमंत्र्यांनीदावोसमधूनअनुभवलाभारतातीलपहिल्याआंतरराष्ट्रीयसायकलिंग ‘ग्रँडटूर’चा थरार

पुणे : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला आज सुरूवात झाली. देशातील ही पहिलीच आंतरराष्टीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले.   ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ला जागतिक स्तरावर ‘टूर डी फ्रान्स’सारख्या स्पर्धांना असलेली प्रतिष्ठा मिळली आहे. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दावोस येथील औद्योगिक परिषदेसाठी जाण्यापूर्वी शुभारंभ कार्यक्रमात जगभरातील सायकलपटूंचे स्वागत केले होते. दावोस येथे राज्याच्या औद्योगिक विकासासाठी  विविध उद्योग संस्थांशी सामंजस्य करार करण्यात व्यस्त असतांनाही त्यांनी महाराष्ट्र आणि पुण्याची आठवण ठेवली. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या या महत्वाच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांनी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांच्या लॅपटॉपवर स्पर्धेतील थरार अनुभवला.    या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत असतांना त्यांनी सायकलपटूंच्या कौशल्याचेही कौतुक केले. सायकलपटूंना पुण्यात मिळणारा प्रतिसाद, इथेले उत्सवाचे स्वरुप, सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेली तरुणाई पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. ही स्पर्धा राज्यातील क्रीडा क्षेत्राला प्रेरक ठरेल आणि सायकलचे शहर ही पुण्याची जुनी ओळख नव्या रुपात पुढे येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी  गेले आहेत. दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमात दोन्ही देशातील वेळांचा फरक लक्षात घेवून त्यांनी स्पर्धेच्यावेळी थेट प्रक्षेपण पाहण्याची  इच्छा व्यक्त केल्यावर सोबत असलेल्या अधिकाऱ्यांनाही या गोष्टीचे कौतुक वाटले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारसू यांनी देखील थेट प्रक्षेपण पाहताना स्पर्धेचा आनंद घेतला.   एका बाजूला महाराष्ट्रात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यासाठी विविध देशांतील उद्योगसमूहांसोबत सामंजस्य करार होत असताना, दुसऱ्या बाजूला राज्यातील क्रीडा क्षेत्रात घडणाऱ्या या ऐतिहासिक घडामोडीकडे दिलेले विशेष लक्ष क्रीडा क्षेत्राला निश्चितपणे प्रोत्साहन देणारे आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या ‘ग्रँड टूर’ स्वरूपाच्या या स्पर्धेला जागतिक व्यासपीठावरून मिळालेली ही दाद क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.   आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम, अत्याधुनिक आयोजन आणि विविध देशांतील नामवंत सायकलपटूंचा सहभाग यामुळे ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ने पुण्याला जागतिक सायकलिंगच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावरून या स्पर्धेचा थरार अनुभवणे, हे आयोजक, खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींसाठी मोठे प्रोत्साहन ठरले असून, यामुळे महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती अधिक बळकट होण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.

Read more

समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे :  डॉ. हर्षदीप कांबळे

सोलापूर : समतादूत हे शासन, सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचविणारे महत्त्वाचे दुवे आहेत. त्यांनी ...

Read more

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महामानव डॉ. आंबेडकर ट्रेड युनियनचे निवेदन

सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांच्या सूचनेनुसार ट्रेड युनियनचे मार्गदर्शक इकबाल तडकल यांनी ...

Read more

मराठी भाषा आपली सांस्कृतिक ओळख  – प्रा.डॉ.संजय चौधरी

  जेऊर - मराठी भाषा ही केवळ संवादाची भाषा नसून ती संतांची, पंतांची, कष्टकऱ्यांची व सामान्य जनतेची भाषा आहे. समाजाला ...

Read more

आ. अभिजीत पाटील यांचे सीना–माढा योजनेतून पाणी सोडण्याचे आदेश

टेंभुर्णी - उजनी जलाशयातून सीना–माढा सिंचन योजनेद्वारे पाणी सोडण्याचे आदेश आमदार अभिजीत पाटील यांनी कार्यकारी अभियंता सुचित्रा डुंबरे यांना दिले ...

Read more

उभ्या ट्रॅक्टर ट्रेलरला मोटरसायकलची धडक; एकाचा मृत्यू

अकलूज - रस्त्याच्या कडेला ऊसाने भरलेल्या उभ्या ट्रॅक्टर ट्रेलरला मोटरसायकल ची धडक बसून एक जणांचा मृत्यू झाला. अकलूज येथील युवक अरबाज ...

Read more

महापालिकेतर्फे सहाय्यक उपनिरीक्षक अजितसिंह देशमुख यांचा सत्कार 

सोलापूर -  महानगरपालिका येथे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एक खिडकी कक्षामध्ये उत्कृष्ट काम केल्याने महापालिका सहायक आयुक्त मनीषा मगर यांच्या ...

Read more

शेतकरी कामगार पक्ष व दिपक आबा गट जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्रीत लढणार

  सांगोला - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष व दिपकआबा साळुंखे पाटील गट हे ...

Read more

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ताकतीने सज्ज; स्नमानपूर्वक जागा मिळाल्यास युती बाबत ठरवू

सोलापूर - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ...

Read more

‘बॅलेट’वर मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन!

मुंबई - राज्यात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची ...

Read more
Page 5 of 5 1 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

काँग्रेसचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणे हेच ध्येय : खा. शिंदे 

 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती  खा. प्रणिती शिंदे, जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्यासह नेतेमंडळी यांच्या...

मोची समाजाचा भाजपाला निर्णायक पाठिंबा; प्रभाग २२ मधील किसन जाधव पॅनलला मोठे बळ

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपाचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली...

प्रभाग 6 मधील जनता सेना-भाजपच्या उमेदवारांचा पराभव करेल

सोलापूर - प्रभाग 6 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येऊन सुद्धा या भागामध्ये एकही ठोस काम न केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या...

प्रभाग २४ मध्ये धनुष्यबाण पुन्हा फडकवणार कार्यकर्त्यांसमोर राजेश काळे यांची भीष्म प्रतिज्ञा

सोलापूर - महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ च्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचे...