Friday, May 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांनीदावोसमधूनअनुभवलाभारतातीलपहिल्याआंतरराष्ट्रीयसायकलिंग ‘ग्रँडटूर’चा थरार

तरुण भारतbyतरुण भारत
January 21, 2026
in india
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला आज सुरूवात झाली. देशातील ही पहिलीच आंतरराष्टीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले.

 

‘बजाज पुणे ग्रँड टूर’ला जागतिक स्तरावर ‘टूर डी फ्रान्स’सारख्या स्पर्धांना असलेली प्रतिष्ठा मिळली आहे. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दावोस येथील औद्योगिक परिषदेसाठी जाण्यापूर्वी शुभारंभ कार्यक्रमात जगभरातील सायकलपटूंचे स्वागत केले होते. दावोस येथे राज्याच्या औद्योगिक विकासासाठी  विविध उद्योग संस्थांशी सामंजस्य करार करण्यात व्यस्त असतांनाही त्यांनी महाराष्ट्र आणि पुण्याची आठवण ठेवली. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या या महत्वाच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांनी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांच्या लॅपटॉपवर स्पर्धेतील थरार अनुभवला.

 

 या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत असतांना त्यांनी सायकलपटूंच्या कौशल्याचेही कौतुक केले. सायकलपटूंना पुण्यात मिळणारा प्रतिसाद, इथेले उत्सवाचे स्वरुप, सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेली तरुणाई पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. ही स्पर्धा राज्यातील क्रीडा क्षेत्राला प्रेरक ठरेल आणि सायकलचे शहर ही पुण्याची जुनी ओळख नव्या रुपात पुढे येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी  गेले आहेत. दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमात दोन्ही देशातील वेळांचा फरक लक्षात घेवून त्यांनी स्पर्धेच्यावेळी थेट प्रक्षेपण पाहण्याची  इच्छा व्यक्त केल्यावर सोबत असलेल्या अधिकाऱ्यांनाही या गोष्टीचे कौतुक वाटले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारसू यांनी देखील थेट प्रक्षेपण पाहताना स्पर्धेचा आनंद घेतला.

 

एका बाजूला महाराष्ट्रात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यासाठी विविध देशांतील उद्योगसमूहांसोबत सामंजस्य करार होत असताना, दुसऱ्या बाजूला राज्यातील क्रीडा क्षेत्रात घडणाऱ्या या ऐतिहासिक घडामोडीकडे दिलेले विशेष लक्ष क्रीडा क्षेत्राला निश्चितपणे प्रोत्साहन देणारे आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या ‘ग्रँड टूर’ स्वरूपाच्या या स्पर्धेला जागतिक व्यासपीठावरून मिळालेली ही दाद क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

 

आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम, अत्याधुनिक आयोजन आणि विविध देशांतील नामवंत सायकलपटूंचा सहभाग यामुळे ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ने पुण्याला जागतिक सायकलिंगच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावरून या स्पर्धेचा थरार अनुभवणे, हे आयोजक, खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींसाठी मोठे प्रोत्साहन ठरले असून, यामुळे महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती अधिक बळकट होण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.

Post Views: 69
Previous Post

समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे :  डॉ. हर्षदीप कांबळे

Next Post

दक्षिणमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी; जिल्हा परिषदेसाठी २३ तर पंचायत समितीसाठी ४६ अर्ज

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दक्षिणमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी; जिल्हा परिषदेसाठी २३ तर पंचायत समितीसाठी ४६ अर्ज

ताज्या बातम्या

सिव्हिल सर्जन डॉ डोईफोडे यांनी मोफत डायलिसिस सेवा केली सक्षम

May 15, 2026

५२ हजार कोटीच्या सोलापूरच्या कामाची घोषणा होती फक्त एक उड्डाणपूल राहिले तेही करू -नितीन गडकरी

May 15, 2026

आ कल्याणशेट्टींनी मागणी करताच गडकरींनी दिली लगेच रिंगरूटला मान्यता

May 14, 2026

खासदार शिंदे म्हणाल्या गडकरी साहेब विरोधकांनाही सन्मानाने वागवतात

May 14, 2026

खासदार प्रणिती शिंदे बद्दलचे वादग्रस्त वक्तव्य;पालकमंत्री गोरे यांना कायदेशीर नोटीस

May 14, 2026

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापुरात दाखल

May 14, 2026
शालांत परीक्षेतील यशवंतांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत गौरव

शालांत परीक्षेतील यशवंतांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत गौरव

May 14, 2026
कंदलगावच्या जीवनज्योत प्रशालेमधील मुलींची दहावी, बारावी परीक्षेत बाजी,दोन्ही वर्गात मुलीच अव्वल 

कंदलगावच्या जीवनज्योत प्रशालेमधील मुलींची दहावी, बारावी परीक्षेत बाजी,दोन्ही वर्गात मुलीच अव्वल 

May 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0864533

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697