सोलापुर – महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असुन सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इच्छुकांची अर्ज घेण्यासाठी भाऊगर्दी झाल्याचे दिसत आहे. २५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतला असल्याची माहिती जिल्हप्रमुख विनायक महिंद्रकर यांनी दिली.
राज्याच्या राजकारणात राज ठाकरे व उध्दव ठाकरे एकत्र आल्याने मनसे व शिवसेनेत उत्साहाचे वातावरण असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इच्छुकांचा ओढा जास्त असल्याचे दिसत आहे.
मनसेचे शहरप्रमुख जैनुद्दीन शेख यांच्या पत्नी सौ.नौशाद जैनुद्दीन शेख यांनी प्रभाग क्रमांक सहासाठी तर विनायक माढेकर यांनी प्रभाग क्रमांक सोळासाठी आज सोन्या मारुती चौकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयात उमेदवारी अर्ज घेतला. यावेळी शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख व प्रभाग क्रमांक तेवीसमधुन शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, सुभाष माने, जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी प्रभाग क्रमांक सातमधुन उमेदवारी अर्ज घेतला आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे उमेदवारी मागितली असुन राज ठाकरेंच्या नेतृत्वात सोलापुरच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे मत सर्व अर्ज घेतलेल्या मनसे सैनिकांनी सांगितले.
यावेळी लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष श्री अभिषेक रंपुरे, वाहतूक सेना शहर अध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर,सुभाष माने व अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


























