मुखेड / नांदेड – निवडनुक आयोगाने नुकतेच जाहिर केलेल्या नगर परिषद निवडनुकिचे बिगुल जाहिर होताच मुखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी साठी शासकिय यंञना सज्ज झाली असुन २७ मतदान केंद्रावर मतदान होणार असुन दि. २ डिसेंबर २५ रोजी मतदान तर बुधवार ३ डिसेंबरला तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असुन या निवडणुकीसाठी २६ हजार ६५६ मतदार मतदानाचा हक्क बजावनार आहेत.या नप सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर पासुन राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून नगरपरिषद कार्यक्षेत्रात मंगळवार पासून आचारसंहिता लागू झाली आहे.
आचारसंहिता चे काटेकोरपणे पालन करावे आचारसंहिता भंग केल्यास निवडणूक आयोगाच्या सूचना नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजेश जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि. ६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात सांगितले.
मुखेड नगर परिषद अंतर्गत एकुण १० प्रभाग २० सदस्य आणि १ नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून निवडुन येणार आहे. म्हणजे एका मतदारास ३ उमेदवारासाठी मतदान करावे लागनार आहे.यात
मुखेड शहरात संभाव्य २७ मतदान केंद्र आहेत २५ हजार ६५६ मतदारापैकी १२ हजार ८११ पुरुष तर १२ हजार ८४४ स्त्री आणि इतर १ मतदार आहेत .
उमेदवारासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असुन १७ नोव्हेंबर रोजी ३ वाजेपर्यंत उमेदवारी दखल करता येईल या कालावधीत रविवार व सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी दि.१८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबरपर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होईल दि. २ डिसेंबर २५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी तहसील कार्यालयात बुधवार ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल.
जात वैधता प्रमाणपत्राबाबत राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पावती नामनिर्देशनपत्रा सोबत सादर करावयाचे आहे. तर जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निवडून आल्याच्या दिनांकापासून ६ महिन्याच्या आत दाखल करणे अवश्यक आहे .
शहरात ४२९ दुबार मतदार नावे असलेले मतदार आहेत.यांचे नियमाणे नावे एका ठिकानी ठेवण्याचे काम पथकामार्फत करणार आहे.
या निवडनुकित जास्तीत जास्त मतदाराने सहभाग घ्यावे.यासाठी मतदार जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. तर मतदान केंद्र वर सर्व प्रकारच्या सुसज्ज ने सुविधा उपलब्ध केले जाणार आहेत.
निवडणूक साठी १९ विविध पथक १५० कर्मचारी तैनात करण्यात येणार असुन निवडणूकी दरम्यान अनुचित प्रकार होवू नये यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शालिनी घुळे, सहा निवडणूक निर्णय अधिकारी सतीश जोहरे आदीसह कर्मचारी उपस्थित होते.




















