तुर्कीच्या इस्तंबूल शहरातील नाईट क्लबमध्ये नूतनीकरणाकरताना लागलेल्या आगीत 29 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तसेच अनेक जण गंभीररित्या होरपळले आहेत. याप्रकरणी क्लबच्या व्यवस्थापकांसह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
इस्तंबूलचा मासक्वेरादे नाईट क्लब गेल्या अनेक दिवसांपासून बंद होता. इमारतीत रेनोव्हेशनचे काम सुरू होते. हा नाईट क्लब 16 मजली इमारतीच्या बेसमेंटमध्ये होता. गवर्नरने सांगितले की, आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. आगीत ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी अधिकांश दुरुस्तीच्या कामातील मजूर होते. याबाबत तुर्कीचे न्याय मंत्री यिलमाज तंक यांनी सांगितले की, चौकशीसाठी 5 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये क्लबचा व्यवस्थापक व नुतनीकार्य प्रभारी व्यक्तीचा समावेश आहे. महापौर इकरेम इमामोगलू यांनी सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण इमारतीची पाहणी केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन व वैद्यकीय पथके दाखल झाली आहेत.