सोलापूर – दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. नागरिकांकडून प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी 3 ते 15 सप्टेंबर असा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत एकूण 38 हरकती प्राप्त झाल्या. जिल्हाधिकारी यांनी दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी सुनावणी घेऊन संबंधितांना हरकती व सूचना सादर करण्याची संधी दिली एकूण प्राप्त 38 हरकतीपैकी 3 हरकती सर्वसाधारण स्वरूपाच्या व प्रभागांच्या सीमांवर कोणताही परिणाम न होणाऱ्या होत्या तर 35 हरकती या प्रभागरचनेवर परिणाम करणाऱ्या स्वरूपाच्या होत्या.
चौकट
संकेतस्थळावर अंतिम प्रभाग रचना उपलब्ध
राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या अंतिम प्रभाग रचनेनुसार आता सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे संबंधित नकाशे, प्रभागाची यादी व तपशील महानगरपालिका मुख्य कार्यालयातील कॉन्सिल हॉल व क्षेत्रीय कार्यालये येथे तसेच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (www.solapurcorporation.gov.in) नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.