उजनी धरणातील ६ पैकी ३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. आज सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. एनडीआरफची टीम घटनास्थळी दाखल आहेत. मृतदेह पाण्यातून काढण्याचे काम सुरु आहे.सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणलोट मंगळवारी (ता.२१) संध्याकाळी बोट बुडाल्याची भीषण दुर्घटना घडली. यात ६ जण बेपत्ता झाले असून ही बोट वादळी वाऱ्यामुळे उलटल्याचे समोर आले आहे. सध्या एनडीआरएफच्या पथकाला ३५ फूट खोल पाण्यात बोट सापडली असून यासह एक मोटार सायकल देखील मिळाली आहे. सध्या हे काढून किनाऱ्यावर नेण्याचे काम सुरू आहे. तर यादरम्यआन बेपत्ता झालेल्या सहा जणांमध्ये आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरेंचा मुलगा बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या स्थानिक प्रशासनासह पोलिस आणि एसडीआरएफ घटनास्थळी असून एनडीआरएफचे पथक १७ तासांनंतरही बेपत्ता ६ जणांचा शोध घेत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...