मोहोळ : मोहोळ शहराच्या साठी ३ हजार
कोटीचा विकास आराखडा मंजूर केला. आम्ही शब्द देणारे माणसं आहोत आणि तो पाळतो म्हणून मोहोळकरांनी धनुष्यबाणाच्या पाठीशी उभे राहून मला ३ तारखेला गुलाल उधळायला बोलवा अशी अपेक्षा मोहोळ येथे केली.
मोहोळ तालुका शिवसेनेच्यावतीने मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचार सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते
व्यासपीठावर आमदार राजू खरे, राष्ट्रवादी(अजित पवार)चे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील शिवसेना ( शिंदे)चे ज जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सिद्धी राजू वस्त्रे, माजी नगराध्यक्षतथा शिवसेना (शिंदे)ओबीसी विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश बारसकर आदीसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले मी मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असून एकदा शब्द दिला की तो पाळतो म्हणून मोहोळचा विकास करायचा असेल तर शिवसेनेच्या हातात सत्ता द्या असे आवाहन केले . शब्द देताना आम्ही विचार करतो आणि तो पाळतोय.पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की येथील शिवसैनिक पंडित देशमुख याचे बलिदान वाया जाऊ देणार नाही चुकीला माफी नाही शिक्षा झाली पाहिजे आणि ती होणार चुकीला माफी नाहीअसा इशारा त्यांनी दिला .
प्रारंभीशिवसेना शिंदे गटाचे राज्याचे ओबीसी प्रमुख आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी या प्रास्ताविक करताना माजी आमदार यांनी मोहोळ शहराचा विकास कसा थांबवला याबाबतची माहिती कथन केली .
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त करताना माजी आमदार यशवंत माने यांनी मोहोळ मतदार संघात वसुली सुरू केली असे सांगत तालुक्यामध्ये वाढलेली दहशत गुंडगिरी संपवली पाहिजे संपवली पाहिजे शिवसैनिक पंडित देशमुख यांना उचलून नेऊन मर्डर केला अडीच वर्ष त्यांना दिली तर मोहोळ मध्ये शिवसैनिकाचा मर्डर केला जातो पुढील काळात त्यांना सत्ता दिली तर ते काय करतील याचा विचार गांभीर्याने करणे गरजेचे असून त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा असे सांगत मोहोळ मध्ये आमची एकी होती म्हणून आम्ही त्यांना ओळखू शकलो .त्यांनी त्यासाठी शिवसेनेच्या नेत्या बरोबर मिलीभगत केली .
अनगर मध्ये सुरक्षा घेऊन उज्वला थिटे यांना उमेदवारी भरण्यासाठी जावे लागले जर मोहोळमध्ये त्यांना सत्ता दिली तर पुढच्या काळात मोहोळकरांनाही उमेदवारी भरण्यासाठी जाताना सुरक्षा रक्षक घेऊन जाव लागेल यासाठी बाहेरची घाण मोहोळ मध्ये येऊ देऊ नका असे ते म्हणाले उपमुख्यमंत्री तथाराज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाली की आम्हाला खुर्चीचा मोह नाही खुर्ची ही जनतेच्या हितासाठी आहे ज्यांनी खुर्चीवर बसवलं त्यांचं काम करणं महत्त्वाचं आहे निधी मिळेलच निधीची कमतरता पडू देणार नाही निर्भयपणे लोकांना जगता आलं पाहिजे दहशतवाद गुंडगिरी रोखण्यासाठी परिवर्तन होणे यासाठी परिवर्तन करा असे ते म्हणाले
मी शब्द देत नसतो आणि दिला तर दिलेला शब्द पाळत असतो असे सांगत असतानाच कमेंटमेट तू हम करते नही एक बार कमेंटमेंट कर दि तो हम खुद की भी नही सुनते असा फिल्मी डायलॉग मारला उपमुख्यमंत्री यांनी मारला



















