अक्कलकोट – साथी हात बढाना एक, अकेला थक जाएगा मिलकर बोज उठाना ‘ या गाण्याची आठवण ध्येयवेडया नगरसेवक. . तम्मा शेळके यांच्या कडे पाहिल्या वर होते . छत्रपती शिवरायांचा इतिहास सर्वांनाच प्रेरणादायी आहे आई भवानी मातेचा गजर करताच जय शिवरायची घोषणा ओठावर येतेच . छत्रपती शिवरायाच्या स्मृती जागताच महाराष्ट्र नव्हे तर राष्ट्र नव्हे तर सारेजग पेटुन उठतो . राष्ट्राभिमान जागृत होतो अशा थोर युगपुरुष राजे छत्रपती शिवाजी राज्याचा प्रेरणादायी आश्वारुढ पुतळा ऐत्यासिक राजघराण्याचा इतिहास वारसा लाभलेल्या अक्कलकोट तीर्थक्षेत्री व्हावा ही महत्वाकांक्षा उराशी बाळगुन नगरसेवक तम्मा शेळके यांनी एक पण केला जो पर्यत अश्वारुढ पुतळा उभा ठाकत नाही तोपर्यत अनवाणी फिरणार . आज३० वर्ष झाली ते अनवाणी. फिरतात .
शिवजयंती उत्सव जवळ आला की अक्कलकोटमध्ये विविध मंडळा कडून उत्साहाने शिवजयंती साजरी होती . शिवप्रेमी मंडळाकडून शासनकर्त्या कडून नगरपालिकेकडून शिवरायाचा पुतळा उभा राहण्याबाबत ठोस कृतीची अपेक्षा शिवभक्ताकडून जनसामान्याकडून व्यक्त होत आहे मात्र ध्येयवेडे तम्मा शेळके यांनी छत्रपती शिवरायाचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा विडा उचलला आहे हे काम पुर्ण केल्या शिवाय . पायात पादत्राणे घालणार नाही अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे याकरिता तम्मा शेळके गेली ३० वर्षापासून अद्यापही अनवाणी फिरतात . या कामाकरिता मी जेव्हा फिरतो तेव्हा पायाला चटके बसल्याने घेतलेल्या या ‘ वसा ‘ ची आठवण होते येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळते . असे शेळके सांगतात .
छत्रपती शिवरायाचा पुतळा बसविण्यासाठी आवश्यक बाबीची पुर्तता विविध परवानगी ना हरकत पत्र शासनाच्या अटीस अधिन राहून आवश्यक ती तयारी अडचणी दुर करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवा संस्था संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके या कामाकरिता ३० वर्षापासुन एकाकी प्रयत्न करीत आहेत याकरिता विविध सामाजिक मंडळे नेते मंडळी लोकसहभाग वाढण्याची . एकत्रित सामुदायिक प्रयत्न होण्याची नितांत गरज आहे शिवप्रेमीनी स्वयस्फुर्तीने सर्व प्रकारच्या मदतीकरिता पुढे येऊन ऐत्यासिक वारसा लाभलेल्या अक्कलकोट मध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक आश्वारूढ पुतळा उभा राहणे . कामी हात सरसावण्याची नितांत गरज आहे . शिवजयंती उत्सवाकरिता झटणाऱ्या युवकांची शक्ती छत्रपतीच्या या स्मारकासाठीही उभी रहावी अशी भावना जेष्ठ शिवप्रेमी नागरिकाकडून व्यक्त होताना दिसते .

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा देणारा पुतळा सार्वजनिक ठिकाणी असायला हवा ही उणीव असलेली खंत दुर करावी अशी तमाम शिवप्रेमीची मागणी आहे . ही शिवप्रेमीची मागणी पुर्ण करण्यासाठी शिवप्रेमी तम्मा शेळके १९९२ पासुन एकाकी झटत आहेत सर्वप्रथम त्यांनी बसस्थानक परिसरातील चौकास छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्याचे निवेदन ३१ जाने १९९२ रोजी सहकारी शिवप्रेमी च्या मदतीने नगरपालिकेस दिले .९ फेब्रुवारी १९९६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्याचा ठराव केला . चौकातील मध्यभागी संरक्षित जागी छत्रपती शिवरायाचां अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी तम्मा शेळके यांनी नपाकडे केली . याकरिता शेळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेची स्थापना केली .नगरपालिकाकडे पाठपुरवा केला . शासनाच्या परवानगीच्या अटीस अधीन राहुन नगर पालिकेने शिवाजी चौकातील संरक्षित जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्या संदर्भात तम्मा शेळके यांच्या संस्थेस अनुमती देण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला . जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगीसाठी शेळके यांनी पाठपुरावा केला या अनुषंगाने विविध विभागाच्या परवानग्या ‘ ना हरकत प्रमाण पत्र संरक्षण संवर्धन जबाबदारी हमी अशा विविध प्रकारच्या परवानगी अटी पुर्तता करण्याचे काम नगरसेवक तम्मा शेळके यांनी केले आहे . या कामाकरिता झटणारा सच्चा शिवप्रेमी मावळा ३१ जाने १९९२ पासून एकाकी झुंज देत आहे आर्थिक परिस्थिती बेताची असताना शिवप्रेमापोटी हा गाडा रेटीत आहे .या कामाकरिता शिव प्रेमीनी साथी हाथ बडाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोज उठाना या प्रमाणे संपुर्ण अक्कलकोटमधुनच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जगभरातुन या कामाकरिता हात सरसावेत . आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्याने
लोकसहभागातून व लोकवाटयातुन हे काम पुर्ण व्हावे अशी भावना नगरसेवक तम्मा शेळके यांनी बोलताना व्यक्त केली …

























