मोडनिंब – मोडनिंब (ता माढा) येथील संगनबसवेश्वर शिवयोगी कन्या प्रशालेचा ३४वा वर्धापनदिन उत्साहात पार पडला. उपस्थितांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा बक्षीस देवून सन्मान करण्यात आले.तसेच पांडूरंग आण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने घेतलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव करण्यात आला.या निमित्त फनी गेम्स,विविध स्पर्धा व आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी मोडनिंब शहरातून मिरवणुकिच्या वेळी लेझिम व झांज पथकाच्या सुंदर सादरीकणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथ ओहोळ होते.
या समारंभास पुण्याच्या प्रथम महिला महापौर कमलताई व्यवहारे,संस्थापक ज्ञानराज व्यवहारे,माजी सभापती नंदाताई सुर्वे,पांडुरंग आण्णा पाटील फाउंडेशनच्या पल्लवी पाटील,सरपंच लक्ष्मी पाटील,ॲड.प्रियंका तळेकर,बाबूराव सुर्वे,एकनाथ सुर्वे,उपसरपंच अमित कोळी, कैलास तोडकरी,वैभव मोरे, दत्तात्रय सुर्वे,सदाशिव पाटोळे,प्रकाश गिड्डे,अशोक साळवी,पोपट दोभाडा, सौदागर जाधव,विशाल मेहता, शर्मिला कोळी, प्रथमेश शिंदे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका संगीता सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सूत्रसंचालन अर्जून बनसोडे,देविदास परबत, शेखर सुर्वे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक दत्तात्रय गवळी,अन्वरहुसेन मुलाणी,धनाजी चोपडे,संतोष माने,संजय कोठावळे,चंद्रकांत घाडगे अर्चना चव्हाण,शोभा रोकडे, रूपाली व्यवहारे यांनी परिश्रम घेतले.


























