सोलापूर – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, इयत्ता १ ते ८ वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आता सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही अनिवार्य ठरल्यामुळे यंदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी तब्बल ४ लाख ७५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. या निकालामुळे भावी शिक्षकांसोबतच अनेक विद्यमान शिक्षकांनी आपले पद टिकवून ठेवण्यासाठी पदासारख्या बढतीसाठी ही परीक्षा देणे बंधनकारक झाले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) साठी यंदा विक्रमी ४ लाख ७५ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षापेक्षा सुमारे १ लाख १७ हजारांनी ही वाढ झाली आहे. जिल्हा परिषद, अनुदानित, विनाअनुदानितसह सर्व खासगी शाळांतील (इयत्ता पहीली ते आठवी ) शिक्षक पदांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) यंदा ४ लाख ७५ हजार उमेदवारांनी नोंदणी केली. गेल्यावर्षी च्या तुलनेत यंदा थेट १ लाख १७ हजार अधिक अर्ज आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांसह सर्व खासगी शाळांना टीईटी अनिवार्य झाल्याने ही विक्रमी वाढ झाली आहे.