बार्शी – मालवण येथे दि. १३ व १४ डिसेंबर रोजी दोन दिवस चाललेल्या राज्यस्तरीय समुद्र जलतरण स्पर्धेत कर्मवीर जलतरण तलाव येथील फ्लिपर्स स्वीम क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत अवघ्या ४ वर्षांपासून पुढील वयोगटातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे या चिमुकल्या खेळाडूंनी ५०० मीटरपासून ते थेट १०किलोमीटरपर्यंत समुद्रात यशस्वी जलतरण करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
खडतर समुद्र प्रवाह, उंच लाटा व आव्हानात्मक वातावरणातही खेळाडूंनी दाखवलेले धैर्य, आत्मविश्वास व तांत्रिक कौशल्य विशेष उल्लेखनीय ठरले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सातत्यपूर्ण सरावाचे हे फलित असल्याचे दिसून आले.
यशस्वी खेळाडू- १) हृदयांश डोईफोडे (वय ४)– ५०० मीटर २) एकांश भोसले (वय ४)– ५०० मीटर ३) शिवराज बारबोले (वय ९)– १ किलोमीटर ४) दर्शन चव्हाण (वय ९)– १ किलोमीटर ५) तन्वी नवले (वय ९)– १ किलोमीटर व १० किलोमीटर ६) शौर्य नवले (वय १०)– २ किलोमीटर व १० किलोमीटर ७) जान्हवी वास्कर– ३ किलोमीटर व १० किलोमीटर ८) माधव शिंदे– ३ किलोमीटर व १० किलोमीटर ९) जयसिंह शिंदे– ३ किलोमीटर व १० किलोमीटर १०) रुद्र नवले– १० किलोमीटर. मार्गदर्शक-
बाळराजे पिंगळे (कोच).
या यशाबद्दल पालक, प्रशिक्षक, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच क्रीडाप्रेमींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


























