सोलापूर – दिवाळीची सुट्टी असल्याने घर बंद करून गावाला गेले होते,अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. अर्धा तोळ्याचे लहान मोठे असे एकुण ३९ सोन्याचे मनी लंपास केले, याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान कोणार्क नगर,जुळे सोलापुरात घडली आहे. याबाबत सिध्दप्पा विठ्ठल बिडवे (वय ४२ रा. कोर्णाक नगर,जुळे सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२ ऑक्टोबर च्या रात्री आठच्या सुमारास फिर्यादी घर बंद करून गावाकडे गेले होते. बंद घरात कोणीतरी अज्ञात चाेरट्याने घराचे कुलूप तोडले, घरात प्रवेश करून घरातील ४० हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळ्याचे लहान मोठे ३९ मणी चोरून नेले आहेत.
फिर्यादी हे २५ ऑक्टोबर रोजी रात्री आठ च्या सुमारास घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात अाले,यावरून त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून या प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार हार हे करीत आहेत.

















