जेऊर – परिवर्तन प्रतिष्ठान व डॉ. दुरंदे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कै. संजना उध्दव तुपरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मुळव्याध तज्ञ डॉ प्रदीप तुपेरे यांनी 471 रुग्णांवर मोफत इंजेक्शन (स्क्लेरोथेरपी) व लेझर ट्रीटमेंटद्वारे उपचार करण्यात आले.
या शिबिराचे संयोजक परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांच्या संकल्पनेतून हे शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये रक्त तपासणी, इंजेक्शन, लेझर ट्रीटमेंट व औषधे मोफत देण्यात आली.
डॉ. अमोल दुरंदे हे गेली २० वर्षापासून सामाजिक, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य कुटुंबांतील रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अतुल भाऊ पाटील (सभापती पंचायत समिती), सुभाष आबा गुळवे मा.जि.प उपाध्यक्ष), सवितादेवी राजेभोसले (जि. प. सदस्य), पृथ्वीराज पाटील (सरपंच, जेऊर),अॅड. सविता शिंदे, सचिन काळे. (तालुका अध्यक्ष, मराठा सेवा संघ), सौ. सोनाली राजेंद्र भोसले ( सरपंच राजुरी), डॉ. प्रदीप तुपेरे उद्धव तुपेरे डॉ. जिनेंद्र दोभाडा डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. दिलीप कुदळे, डॉ. गणेश बंडगर, डॉ. अमित कुमार मेरगळ, डॉ. पापा मनेरी, डॉ. अभय बदे, डॉ. माऊली वाघमोडे, डॉ. आकाश पवार डॉ. सचिन शेटे, डॉ. सुनील फाळके, बाळू पारखे, एकनाथ शिंदे, हनुमंत जगताप मेजर, खंडू शिंदे गुरुजी, डॉ. नितीन समुद्र डॉ. विलास सकट, आबासाहेब टापरे, मोहन मारकड (सरपंच विहाळ), भाऊ शेळके (सरपंच सावडी), मनोहर कोडलिंगे (सरपंच पोंधवडी), लक्ष्मीकांत पाटील इ. उपस्थित होते.
परिवर्तन प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. अमोल दुरंडे शिबीरात विचार व्यक्त करताना

























