हदगाव – तालुक्यातील हरडफ येथे ५३ व्या धम्म मेळावा उद्या रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. प्रथम सत्रात सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण धम्मकीर्ती महिला मंडळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सकाळी साडेनऊ वाजता धम्मदेसना उपासक आर. व्ही वाठोरे, उपासक गणपण वाठोरे देणार आहेत दुपारी बारा वाजता तथागत गौतम बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या तेल चित्राची गावातील प्रमुख रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. द्वितीय सत्र सुरू होईल सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत यामध्ये प्रमुख उपस्थिती अँड. डी. एफ. हरदडकर उद्योजक मारुती रामजी भगत अहमदाबाद सामाजिक कार्यकर्त्या लताबाई मारुती मुनेश्वर इत्यादीची विशेष उपस्थिती लाभणार आहे उपस्थित सर्व मान्यवरांचा धम्म मेळावा कमिटीच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेंद्र नरवाडे. प्रकाश वाठोरे. प्रवीण वाठोरे हे करणार आहे तृतीय सत्र सुरू होईल रात्री आठ वाजता यामध्ये बुद्ध भीम गीताचा जंगी मुकाबला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सचिन नागवंशी यांचा अकोला व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका अश्विनी राज ग्रुप संच मुंबई यांचा वैचारिक सामना होणार आहे तरी परिसरातील सर्व जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष विक्रांत वाठोरे, उपाध्यक्ष संदीप रायघोळ , सचिव कपिल वायवळ, सहसचिव शेषराव वाठोरे, कोषाध्यक्ष सिद्धार्थ वाठोरे, कोषाध्यक्ष माधव आढागळे, सदस्य उत्तम नरवाडे, ज्ञानेश्वर थोरात , सिद्धार्थ नागोराव वाठोरे यांनी केले आहे


















