कळंब / धाराशिव – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा शाळेमध्ये दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी 53 वे तालुकास्तरीय विज्ञान, गणित, पर्यावरण चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद चे शिक्षणाधिकारी प्राथमिक नागेश मापारी , गटविकास अधिकारी सोपान अकेले , गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे, उपशिक्षणाधिकारी संतोष माळी, विस्ताराधिकारी सुशील फुलारी, संभाजी जगदाळे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनाचे प्रास्ताविक- कळंब पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते यांनी केले तर स्वागतपर मनोगत जिल्हा परिषद भाटशिरपूरा शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनी केले .या प्रदर्शनामध्ये कळंब तालुक्यातील बहुसंख्य शाळेने भाग घेतला होता या मध्ये पहिली ते आठवी प्राथमिक विद्यार्थी प्रयोग सहभाग 79 शाळेने सहभाग घेतला तर चार शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य सहभाग घेतला व माध्यमिक विद्यार्थी प्रयोग 35 शाळेने सहभाग घेतला तर चार माध्यमिक शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य सहभाग घेतला. एकूण 114 विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात प्रयोग सादर केले तर आठ शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य सहभाग घेतले या वेळी उपस्थित मान्यवर सरपंच सुनीता वाघमारे, उपसरपंच सूर्यकांत खापे , भक्तराज दिवाने ,प्रशांत घुटे, महादेव मेनकुदळे व कळंब तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी भाटशिरपुरा सचिन तामाने, अमोल बाभले, नागेंद्र होसाळे, राजाभाऊ शिंदे, लिंबराज सुरवसे, कालींदा मुंडे राजकन्या तोडकर, गणपत तपिसे यांनी परिश्रम घेतले. या विज्ञान प्रदर्शनास तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत तांबारे तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी संतोष माळी यांनी केले.
























