अक्कलकोट – तालुक्यातील मैंदर्गी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सातव्या दिवशी स्थानिक गटाकडून माजी नगरसेविका शिवम्मा यल्लप्पा पोतेनवरू सह सहा जणांनी अर्ज दाखल केल्या असून नगरसेवक पदासाठी तब्बल ५४ जणांनी रविवारी विक्रमी उमेदवार अर्ज सादर केले आहेत.
मैंदर्गी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडून प्रभाग क्रमांक आठ महिला उमेदवार सपना संजय मोरे यांचे नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्याकडे दाखल केले.याप्रसंगी शिवानंद दिवटे शिवचलप्पा चव्हाण संजय मोरे सुरेश नागुर आदी उपस्थित होते.
तसेच भाजपकडून प्रभाग क्रमांक दहा मधून सर्वसाधारण जागे करिता युवा उद्योजक व भाजप नेते सुरेश नागुर यांचे नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्याकडे दाखल प्रसंगी दयानंद बमनळी संजय मोरे काशिनाथ जकापुरे आदी उपस्थित होते.
मैंदर्गी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी स्थानिक गटाकडून माजी नगरसेविका शिवम्मा यल्लप्पा पोतेनवरू यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल


















