सोनखेड (तभा वृत्तसेवा)
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये खरीप 2023 मध्ये नुकसानीची अधिसूचना माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेली असतानाही युनायटेड इन्शुरन्स कंपनीने आज पर्यंत नुकसान भरपाई न देता शेतकऱ्याची पिळवणूक केली
त्याचा निषेध म्हणून शेतकऱ्याने रक्तदान आंदोलन केले त्या आंदोलनात 56 रक्त पिशव्या जीवन आधार ब्लड बँकेकडे शेतकऱ्याने संकलित केले हे आंदोलन सामाजिक भावनेतून पोशिंदाच्या भूमिकेतून आगळे वेगळे आंदोलन शेतकऱ्याने करून पिक विमा कंपनीचा निषेध केला अशी प्रतिबंधन मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी केले यावेळी शेतकरी नेते तुकाराम अण्णा मोरे माधवराव देसाई हरबळकर बाबाराव देशमुख बालासाहेब मोरे बालासाहेब आंबेसांगवीकर विजयराव मोरे सुधाकर येळीकर गणेशराव मोरे एडवोकेट देविदासराव मोरे शंकरराव मोरे संदीपराव मोरे गजाननराव मोरे रामराव मोरे गोपाळराव मोरे सुरेशराव मोरे विनायकराव देशमुख सावळे पिंपळगावकर खुशाल पाटील दगडगावकर शंकर वड दिना भाऊ साहेबरावजी तात्या इत्यादी युवा शेतकरी उपस्थित होते
खरीप 2023 चा पिक विमा आजपर्यंत शेतकऱ्याला मिळाला नाही शासन निर्णयानुसार माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी नुकसानेची अधिसूचना काढली आहे निश्चित कालावधीच्या आत नुकसान भरपाई देणे विमा कंपनीवर बंधनकारक असताना आजपर्यंत विमा कंपनीने नुकसान भरपाई नाही हप्ता म्हणून शेतकऱ्याकडून एक रुपया व शासनाकडून साडेसहा हजार रुपये कंपनीने एवढी मोठी रक्कम घेतली आहे कंपनी ही नफेखोर असून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करत आहे
माननीय जिल्हाधिकारी हे जिल्हा पिक विमा समितीचे अध्यक्ष आहेत तर जिल्हा कृषी अधीक्षक हे सचिव आहेत ही समिती जिल्ह्यातील पिकविमा च्या बाबतीमध्ये निर्णय घेते
राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समितीचे अध्यक्ष पद राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे आहे व शेतकरी व विमा कंपनी यांचा मध्यस्थ म्हणून कृषी विभाग काम पाहते कृषी आयुक्तालय विमा कंपनी व शेतकरी यांचा मध्यस्थ म्हणून काम करतात परंतु या जागतिकीकरणाच्या काळामध्ये असंतुलित वातावरणामध्ये शेतकऱ्यांचा अधिकच नुकसान होणार आहे
हे सर्वांना मान्य असताना वास्तव मध्ये कृषी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आजपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही कंपनी विविध मार्गाचा वापर करून शेतकऱ्यांचे आर्थिक पिळवणूक करते शेतकरी हा साधा भोळा आहे याचा गैरफायदा कंपनी उचलून आजपर्यंत नुकसान भरपाई दिली नाही त्याचा निषेध म्हणून सोनखेड परिसारातील शेतकऱ्यांनी एक सामाजिक जाणीवेतून एक वेगळया आगळया प्रकारे विमा कंपनीच्या पिळुनुकीचा निषेध व्यक्त केला
कंपनी शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान करून शेतकऱ्यांचे रक्त पीत आहे तर शेतकरी पोशिंदाच्या भूमिकेत भूमिकेत सामाजिक जाणीवेतून रक्तदान आंदोलन करत आहे सरकारने व प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी भावना यावेळी शेतकरी व्यक्त करत होते
आज सोनखेड बाजार मैदान येथे शेतकऱ्याने रक्तदान आंदोलन केले यावेळी जीवन आधार या रक्तपेढी कडे 56 पिशवी रक्त संकलन केले यावेळी शेतकऱ्यांनी रक्तपेढीचे कर्मचारी राजू उबाळे व पाटील व कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले
त्यावेळी सोनखेड परिसरातील सोनखेड येवलापिपळगाव मडकी पिपळनवाडी शेलवाडी पळशी बोरगाव जवळा दगडगाव जानापुरी वडेपुरी बेडसांगवी भेंडेगाव जामगाव शिवनी कारेगाव पेनुर शेवडी आधी गावातील युवा शेतकऱ्याचा समावेश होता