माळशिरस – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली,उच्च न्यायालय मुंबई, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे अध्यक्ष एस.एस.शर्मा व सचिव पी.पी. पेठकर व रा.वी. ताम्हाणेकर अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती माळशिरस तथा जिल्हा न्यायाधीश –1 माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती, सोलापूर व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालत मध्ये तब्बल 599 प्रकरणे निकाली काढण्यात येऊन एकूण 2 कोटी 76 लाख 47 हजार 194 रकमेची वसुली करण्यात आली.
यासाठी एकूण आठ पॅनल तयार करण्यात आलेले होते .पॅनल प्रमुख म्हणून.रा . वि.ताम्हाणेकर अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती माळशिरस तथा जिल्हा न्यायाधीश -1 हे होते.
सदर लोक अदालतीत 290 न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यात आले तसेच दाखल पूर्व प्रकरणे (माळशिरस तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन ओव्हरसीज बँक,नगरपरिषद, नगरपालिका नगरपंचायत,ग्रामपंचायत ) यांची एकूण 309 प्रकरणे निकाली काढण्यात आली व गुन्हा कबुलीची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
सदर लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी .एल डी हुली , जिल्हा न्यायाधीश 2, माळशिरस,.एस. डी घनवट दिवाणी न्यायाधीश व. स्तर, माळशिरस, .बी डी गोरे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, माळशिरस,.यु. बी. पेठे, दिवाणी न्यायाधीश क .स्तर, माळशिरस, .ए.ए व्यास 2रे सह दिवाणी न्यायाधीश .व. स्तर, माळशिरस, .जी. एम. बिरादार 3रे सह दिवाणी न्यायाधीश . क .स्तर, माळशिरस, श्री.एम.जे.गायकवाड 4 थे सह दिवाणी न्यायाधीश . क .स्तर, माळशिरस व सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
























