अकलूज – निवडणूक 2025 अंतर्गत अकलूज नगरपरिषदेच्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज सकाळी ११ ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत पार पडली. या छाननीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी आलेल्या अर्जांपैकी एकूण १०७ अर्ज पात्र ठरले.नगराध्यक्ष पदासाठी ७ अर्जा पैकी १ अपात्र ठरला आहे.
नगराध्यक्ष पदासाठी एकूण ७ अर्ज प्राप्त झाले होते.त्यातील ६ अर्ज पात्र ठरले, तर १ अर्ज अपात्र करण्यात आला.अपात्र ठरलेला अर्ज हा डमी अर्ज असल्याने व त्यावर फक्त एकच सूचक असल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार तो अर्ज अवैध ठरविण्यात आला.
सदस्यपदासाठी १४६ पैकी १०१ अर्ज पात्र एकूण १ ते १३ प्रभागासाठी १४६ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते.छाननी दरम्यान ४५ अर्ज अपात्र ठरले तर १०१ अर्ज पात्र झाले.यामुळे अंतिम छाननीनंतर अध्यक्षपदासाठी ६ आणि सदस्यपदासाठी १०१ असे एकूण १०७ अर्ज पात्र ठरले.छाननी प्रक्रिये दरम्यान कोणत्याही उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराच्या अर्जाविरोधात कोणतीही हरकत (ऑब्जेक्शन) नोंदवलेली नाही.
*निवडणूक आयोगाचा सुधारित नियम.*
राज्य निवडणूक आयोगाने काल जारी केलेल्या सूचनेनुसार मान्यता प्राप्त पक्षांच्या पूरक उमेदवाराच्या अर्जावर फक्त एकच सूचक असल्यास तो अर्ज वैध मानावा, आणि उमेदवाराने माघार घेतली नाही तर त्याला अपक्ष म्हणून ग्राह्य धरावे असे नमूद केले होते.तथापी आज आयोगाने सुधारित सूचना काढून स्पष्ट केले की राजकीय पक्षाच्या पूरक उमेदवाराला जर केवळ एक सूचक असेल तर त्याचा अर्ज वैध धरण्यात येणार नाही. अपक्ष म्हणून पात्र होण्यासाठी किमान पाच सूचक असणे बंधनकारक आहे.
अकलूज नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रभागनिहाय अपात्र अर्ज (बाद अर्ज) प्रभाग १ मधून ४ उमेदवार,प्रभाग २ मधून २ उमेदवार ,प्रभाग ३ मधून ५ उमेदवार,प्रभाग ४ मधून ३ उमेदवार, प्रभाग ५ मधून ३ उमेदवार,प्रभाग ६ मधून ४ उमेदवार,प्रभाग ७ मधून २ उमेदवार,प्रभाग ८ मधून २ उमेदवार, प्रभाग ९ मधून ५ उमेदवार,प्रभाग १० मधून ३ उमेदवार,प्रभाग ११ मधून ५ उमेदवार,प्रभाग १२ मधून ३ उमेदवार,प्रभाग १३ मधून ४ उमेदवार


















