बंगळुरू, 19 नोव्हेंबर (हिं.स.) : कर्नाटक पोलिसांनी स्थानिक चित्रदुर्ग जिल्ह्यात 6 अवैध बांगलादेशी घुसखोरांना अटक केलीय. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यासंदर्भात कर्नाटक पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार धवलगिरी लेआउट फेज II मधील कर्नाटकातील चित्रदुर्गातील होलालकेरे रोडवरील अरविंद गारमेंट्स आणि व्हाईट वॉश गारमेंट्सजवळ गस्तीदरम्यान 6 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले. चौकशीदरम्यान हे सर्व बांगलादेशचे नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अनेक वर्षांपूर्वी त्यांनी येथे स्थायिक होण्याच्या उद्देशाने अवैधरित्या भारतात घुसखोरी केली. त्यांनी कोलकाता येथे बनावट आधार कार्ड आणि कागदपत्रे खरेदी केली आणि भारतातील विविध राज्यांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या घुसखोरांनी नुकतेच रोजगारासाठी चित्रदुर्ग गाठले. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, लेबर कार्डसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सर्वांवर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.