सोलापूर – आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण तालुक्यातील साठ हजार शेतकर्यांच्या नुकसान झाले असून सर्व शेतीपिकांचे पंचनामे करण्यात आली आहेत. या सर्व शेतकर्यांना ६४ कोटी रूपये नुकसानभरपाई अहवाल सादर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यावर्षी खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. म्हणून राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले असून लवकरच या शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे.
आॅगष्ट महिन्यात दक्षिण तालुक्यातील बोरामणी व मुस्ती मंडलमधील ११ हजार ९१५ हेक्टरवरील १४ हजार ७०३ शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायत नऊ हजार ८०६ हेक्टर , बागायत एक हजार ९८० हेक्टर व फळपिक १२८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या शेतकर्यांना १२ कोटी नुकसानभरपाई मिळणार आहे.
सप्टेंबर महिन्यात वळसंग व होटगी मंडलमध्ये अतिवृष्टी झाला. यामध्ये १४ हजार ५० शेतकर्यांचे नुकसान झाले असून १४ हजार ३२९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाली आहे. यामध्ये जिरायत दहा हजार दोन हेक्टर, बागायत तीन हजार सातशे तीन हेक्टर व फळपिक ६२४ हेक्टरचा समावेश आहे. या शेतकर्यांना १६ कोटी २० लाख नुकसानभरपाई मिळणार आहे.
मंद्रुप अप्पर तहसीलअंतर्गत औराद, मंद्रूप, निंबर्गी व विंचूर या मंडलमधील ३१ हजार १३१ शेतकर्यांचे नुकसान झाले असून २९ हजार ७३९ हेक्टरच्या पिकांचे नुकसान झाली आहे. यामध्ये जिरायत १८ हजार ७४७ , बागायत ९ हजार २२७ व फळपिक एक हजार ७७३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या शेतकर्यांना १६ कोटी १० लाख रूपये नुकसानभरपाई मिळणार आहे.
…..
या पिकांचे नुकसान
….
जिरायत पिकामध्ये तुर, मूग, उडीद, सोयाबीन,मका, बाजरी,भूईमूग,कापूस, सूर्यफूल व मटकी पिकांचा समावेश आहे.
बागायत पिकामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, वांगी, दोडका, घेवडा व ऊस या पिकांचा समावेश आहे.
तर फळपिकामध्ये डाळींब, केळी, पपई, लींबू, सीताफळ व बोर या फळांचा समावेश आहे.
….
..
दोन महिन्यापासून नुकसान पिकांचे पंचनामे
…
आॅगष्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या दक्षिणमधील सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळणार असल्याने मुदतीच्या आत पंचनामे पूर्ण करण्यात आली आहेत. दिवाळीच्या आत पंचनामा अहवाल सादर करण्यात आल्याने नुकसानभरपाई मिळण्यास मदत होईल.
अवधूत मुळे, तालुका कृषी अधिकारी, दक्षिण सोलापूर