तायवानची राजधानी असलेल्या तैपेई शहरात आज, बुधवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. यानंतर त्सुनामीचा येण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 25 वर्षात तायवानमद्ये आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी नोंदवली गेली. या भूकंपामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच या भूकंपानंतर लगेचच जपानमध्ये त्सुनामी इशारा देण्यात आला आहे.
भूकंपामुळे झालेल्या जीवित व मालमत्तेच्या नुकसानाबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. भूकंपामुळे 3 मीटरपर्यंत त्सुनामी येण्याची शक्यता जपानच्या हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच ओकिनावाच्या दक्षिणेकडील प्रीफेक्चरजवळील किनारपट्टीच्या भागांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. भूकंपाने तैवानच्या पूर्वेकडील हुआलियन शहरातील इमारतींचा कोसळल्या आहेत. तर रेल्वे सेवा बंद करण्यात आली. तैपेईमध्येही मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. राजधानीपासून बेटाच्या दुसऱ्या बाजूला सकाळी 7 वाजून 58 मिनीटांनी भूकंप झाला, भूकंपमापकावर याची नोंद 7.2 रिश्टर नोंदवल्या गेली. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार बुधवारी आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. त्याचा केंद्रबिंदू बेटाच्या पूर्वेला हुआलियन शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर होता. तायवानच्या हवामान अधिकाऱ्यांनी सांगितले की. 1999 नंतर आलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. चीन आणि तैवानच्या काही किनारपट्टीवर 1 ते 3 मीटर उंचीच्या सुनामी लाटा येण्याची शक्यता आहे. दरम्यान हा भूकंपाचे हादरे संपूर्ण चीनमध्ये देखील बसल्याचे समजते.