गंगापूर / संभाजीनगर – नगरपरिषदेच्या निवडणूक २०२५ करीता मंगळवारी ( दि.२) शांततेत मतदान पार पडले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.तसेच प्रभाग क्रमांक सहा “ब” आणि प्रभाग क्रमांक चार “ब “करीता वीस तारखेला मतदान होणार आहे.निवडणूकीचा निकाल २१ तारखेला लागणार आहे.
सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत २१ हजार१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात ,पुरुष १०हजार सातशे ८८ आणि महीला ,१० हजार दोनशे २८ व ईतर १ , असे एकूण २१हजार १७ मतदान झाले आहे मतदान टक्केवारी ७१.७६ टक्के झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी दिली आहे.
यानिवडणूकीत सर्वच पक्षांनी जोरदार प्रयत्न केले.त्यामुळे निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली.निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष आगळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.निलेश पालवे पोलिस निरीक्षक कुमारसिंह राठोड यांनी प्रयत्न केले.


























