डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्याने सध्या तणाव निर्माण झालेला आहे नाशिकमध्ये महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात आता घोषणाबाजी देण्यात येतील पुन्हा पुतळा बसवण्याची आंदोलकांनी मागणी केलेली आहे अन्यथा आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला.
नाशिकरोड भागातील जयभवानी रोड परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्याने सध्या तणाव निर्माण झालेला आहे. नाशिकमध्ये महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. पुन्हा पुतळा बसवण्याची आंदोलकांनी मागणी केलेली असून अन्यथा आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
नाशिकच्या जयभवानी रोडवरील मनपाच्या नियोजित उद्यानात 6 डिसेंबरला आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला होता, परवानगी न घेता पुतळा बसविल्यानं मध्यरात्री मनपाने पुतळा हटविला. त्यामुळे काही प्रमाणात तणाव निर्माण झाला असून नागरीक रस्त्यावर येण्याची शक्यता लक्षात घेऊन बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकरोड परिसरातील जयभवानी रोडवरील तुळजाभवानी मंदिराशेजारी मनपाच्या जागेत उद्यान साकारण्यात येत आहे. त्यामध्ये नव्याने बसविलेल्या गजिबो अनधिकृतपणे चबुतरा बांधून पूर्वपरवानगी न घेता त्या चबुतऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर या ठिकाणाहून पुतळा हटविण्यात आला होता. या पार्शवभूमीवर आज स्थानिकांनी एकत्र येत पुन्हा पुतळा बसवावा ह्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविल्यानं तणाव निर्माण झाला असून स्थानिक नागरिक एकत्र आले. पुतळा हटविला त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेऊन अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर मनपा आणि पोलीस प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पुन्हा पुतळा बसवावा ह्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले असून जर असे झाले नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे. जय भवानी रोड परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेचा एक नियोजित उद्यान आहे. या उद्यानाच्या जागी एक चौथरा आहे. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आलेला होता. मात्र प्रशासनाने परवानगी न घेता पुतळा बसविल्याने तो काढून टाकण्यात आला. यानंतर परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती मिळाली असता नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान तुळजाभवानी मंदिराशेजारी दोन ते अडीच गुंठ्यामध्ये मनपाकडून उद्यान विकसित करण्यात येत आहे. उद्यानाच्या पाठीमागे सहा गुंठे जागेत जलकुंभ उभारण्यात आला आहे. उद्यानामध्ये जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी पॅगोडे बांधण्यात आले आहेत. त्यामध्ये सहा डिसेंबर रोजी अज्ञातांनी चबुतऱ्याचे बांधकाम केले. त्या चबुतऱ्यावर आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा बसवला. उद्यान विकसित करणारे ठेकेदार आणि मजूर दैनंदिन विकासकामे करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे एक चबुतरा व त्यावर महापुरुषाचा अर्धाकृती पुतळा बसविलेला आढळला. त्यानंतर ठेकेदार यांनी हि माहिती अधिकाऱ्यांना कळविली. त्यानंतर तातडीने विभागीय अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान अनधिकृत पुतळा बसविल्याप्रकरणी तिघांविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.