माढा : माढा शहरातील कसबा पेठ कानडे गल्ली येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरास पुणे आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक या गावच्या शिवाजी हरिभाऊ गेंगजे या भक्ताकडून तब्बल ९ लाख रुपये किमत असलेले ६ किलो वजनाच्या चांदीचे प्रभावळ श्री विठ्ठल चरणी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने अर्पण करण्यात आले आहे. शिवाजी गेंगजे हे मूळचे आंबेगाव येथील रहिवासी आहेत ते माढा येथे रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात सेवेस होते ते सध्या सेवानिवृत्त झाले आहेत.
माढा येथे नोकरी कालावधी त्यांची येथील विठ्ठलावर श्रद्धा निर्माण झाल्याने त्यांनी श्री विठ्ठल मंदिरा चांदीचे प्रभावळ अर्पण केले आहे. प्रा. गेंगजे यांनी मंदिरास प्रभावळ अर्पण केल्याने श्री विठ्ठल मंदिर कसबा पेठ यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहे. मंदिर उत्सव समितीकडून शिवाजी गेंगजे व त्यांच्या सुविधे पत्नी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कीर्तनकार ह भ प प्रतीक्षा बनकर, प्रसाद गेंगजे,नारायण भांगे, अजित गवळी, अनिल शहाणे, दिनकर चव्हाण,मंदिराचे पुजारी बापू कुंभेजकर, गणेश भांगे आदी भाविक उपस्थित होते.




















