सांगोला – उच्च न्यायालय, मुंबई, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे एम.एस. शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे पी.पी.पेठकर व तालुका विधी सेवा समिती, सांगोलाचे अध्यक्ष पी.आर.कुलकर्णी व विधीज्ञ संघ सांगोला यांचे सहकार्याने शनिवार दि.१३ डिसेंबर रोजी दिवाणी न्यायालय, सांगोला आवारामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करणेत आले होते.
सदर लोकअदालतीत एकूण ९८ प्रलंबीत प्रकरणे निकाली करण्यात आली. तसेच दाखलपुर्व (बँक, पतसंस्था, नगरपालीका, ग्रामपंचायत, एम.एस.ई.बी.यांचे वसुलीची) एकुण ८३० प्रकरणे निकाली झालेली आहेत. एकूण ९२८ निकाली प्रकरणांमधुन १ कोटी ३१ लाख ०७ हजार ४८३ रुपयांची तडजोड करण्यात आली. ५ वर्षाहुन जुनी एकुण ३ प्रकरणे व १० वर्षापेक्षा जास्त जुन्या १ प्रकरणांमध्ये सामंजस्याने तडजोड करुन सदर प्रकरणे लोकअदालतीत निकाली करणेत आली. तसेच कौटुंबीक वादातून विभक्त झालेल्या १ प्रकरणांमध्ये समेट घडवून त्यांना पुन्हा एकत्र जोडण्याचे काम या लोकअदातीमध्ये करणेत आले. सदरचे लोकअदालत यशस्वी करणेकरीता विधीज्ञ संघाचे अध्यक्ष विधिज्ञ एम.एन.ढाळे, विधिज्ञ संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व विधिज्ञ यांनी सहकार्य केले. तसेच सांगोला न्यायालयाचे सहा.अधिक्षक, ए.एस.बमनळ्ळी, विधीसेवा समिती, सांगोलाचे कर्मचारी वरिष्ठ लिपीक डी.एम.डाेईफोडे व सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
सदर राष्ट्रीय लोकअदालत मध्ये पॅनल प्रमुख म्हणून पॅनल क्र.१ साठी दिवाणी न्यायाधीश क.स्तर पी.आर.कुलकर्णी व विधिज्ञ एच.डी.मेनकुदळे-घोंगडे, पॅनल क्र.२ साठी सह.दिवाणी न्यायाधीश क.स्तर ए.ए.पाटील व विधिज्ञ ए.एस.सुतार, पॅनल क्र.३ साठी २ रे सह.दिवाणी न्यायाधीश क.स्तर एस.एस.साळुंखे यांनी काम पाहीले.


























