मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीबाबत विधान भवन, नागपूर येथे बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री तानाजी सावंत, गिरीश महाजन, संजय राठोड, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्या महाराष्ट्रात एकूण 132 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 22 रूग्णालयात आहेत. राज्यातील कोरोना केसेसचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. जागतिक परिस्थिती, संभाव्य वाढीच्या बाबतीत राज्याची तयारी, लसीकरण, इत्यादी विषयांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली . प्रत्येक जिल्ह्यातील नोडल अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील .नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही; मात्र सर्वांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.