सेंट्राल बोर्ड ऑफ सेंकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार आहेत. शिक्षण मंत्रालयाच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार शालेय शिक्षणासाठी एका वर्षात 2 बोर्ड परीक्षांची घोषणा करून मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत.
मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा दोनदा घेतल्या जातील आणि त्या मुदतवार परीक्षा नसतील. दोन वेगळ्या बोर्ड परीक्षा घेतल्या जातील आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुण ठेवण्याची परवानगी दिली जाईल. शिक्षण मंत्रालय, 2024 पासून अभ्यासक्रमात मोठे बदल करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) नवीन अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. आता 2024 च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहे.शिक्षण मंत्रालयाने म्हटले की नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना 2 भाषांचा अभ्यास करावा लागेल, त्यापैकी किमान एक भारतीय भाषा अनिवार्य असेल. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण कायम ठेवण्याची परवानगी दिली जाईल.
शिक्षण मंत्रालयाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यांतर्गत, बोर्ड परीक्षासाठीच्या अनेक महिन्यांचे कोचिंग आणि रट्टा मारत अभ्यास करण्याच्या क्षणतेऐवजी विद्यार्थ्यांच्या आकलन आणि प्रावीण्यचे मूल्यांकन करेल. नव्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, इयत्ता अकरावी आणि बारावी मधील विषयांची निवड ‘स्ट्रीम’पूर्ती मर्यादित राहणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. तसेच वर्गाखोल्यांमध्ये पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम संपवण्याची प्रथा यामुळे संपुष्टात येईल. शिवाय पाठ्यपुस्तकांच्या किंमती खाली येतील. नवीन शैक्षणिक धोरणाला 29 जुलै 2020 रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. यामध्ये शैक्षणिक धोरणात समानता, गुणवत्ता अशा अनेक मुद्द्यांवर लक्ष देण्यात आले आहे. केंद्र आणि राज्याच्या सहकार्याने सरकारने नवीन शैक्षणिक धोरणावर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.