पंढरपूर शहरात नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी व आषाढी यात्रा कालावधीत केलेल्या रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने पंढरपूर नगरपरिषदेसमोर टाळ वाजवून भजन म्हणून अनोखे आंदोलन केले. यानंतर प्रशासनाच्यावतीने नायब तहसिलदार कोळी यांनी कॉंग्रेसचे निवेदन स्वीकारले.
यावेळी सुहास भाळवणकर, संदिप शिंदे, सागर कदम, पुरूषोत्तम देशमुख, मिलिंद अढवळकर, नागनाथ अधटराव, देवानंद इरकल, शिवकुमार भावलेकर, भाऊ तेलंग, संतोष हाके, मधुकर फलटणकर, सोमनाथ आरे, सुनिल उत्पात, शामराव साळुंखे, मयूर भुजंगे, महेश अधटराव, मल्हारी फाळके, प्रकाश साठे, समाधान पोळ,राहुल गवळी, किशोर जाधव, सागर पोरे, सागर लोखंडे, राज वाघमारे, नंदू आगावणे, आदित्य शेटे, सुनिल क्षिरसागर आदी उपस्थित होते.