‘उमेद’ अभियानच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या मिलेटस खाद्यपदार्थाच्या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प संचालक अमोल जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, महेंद्र महाजन उपस्थित होते.
यावेळी बचत गटातील महिलांशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आव्हाळे म्हणाल्या की, उमेद बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम चांगला असून या प्रशिक्षणाचा फायदा महिला बचत गटांनी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे पॅकेजिंग उत्कृष्टपणे करून मार्केटिंग ही करण्याच्या तंत्राचा अवलंब करावा. व आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले.
कासाळगंगा नदीकाठच्या पंढरपूर, सांगोला तालुक्यातील बचतगटांच्या महिलांना आत्माच्या माध्यमातून सगरोळी ( जिल्हा नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्रातून ‘मिलेटस’ खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. उत्पादनासोबत पॅकिंग, मार्केटिंगची माहिती देण्यात आली आहे. अशा प्रशिक्षित भगिनीनी ज्वारीसह बाजरी, नाचणी पासून तयार केलेले पौष्टीक, आरोग्यदायी, रुचकर खाद्यपदार्थ प्रदर्शनात ठेवण्यात आलेले होते. या महोत्सवातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला व येथील आरोग्यदायी व पौष्टिक खाद्यपदार्थांची खरेदी केली.