सोलापूर जिल्हा परिषदेच्या तब्बल २० कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कारवाईचा बडगा उचलला असून वर्षानु वर्ष प्रति नियुक्तीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे. ही कारवाईची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. त्यांची सेवा मुळ ठिकाणी वर्ग करण्यात आली असून प्रतिनियुक्त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आस्थापनेत परिच्छेद लागल्याची बाब निदर्शनास आल्याने रद्द करण्यात आल्याची माहीती पत्रकार परिषदेत दिली.
या वीस कर्मचाऱ्यांमध्ये आर. पी. देशपांडे, ए. एन. भोसले, आर. एस घोडके, प्रदिप वि.सगट, एम.एस. काशेटटी, जी.टी. रेवे, पी. एन. मोरे, व्ही.आर. रणदिवे, एस. के. पोतदार, ए. व्ही. माळी, आर. के. गुरव, व्ही. एन. गाडे, एम. डी. चिंचोळे, एस. एस. माने, खदीरपाशा खाजानुर सय्यद, पाटील अनिल ज्ञानेश्वर, रविकांत भिमराव कोरे, सचिन एल. घोडके, एस.पी.बाणुर, प्रदीप सगट यांचा समावेश आहे.