पदमशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. यंदा शतक महोत्सवी वर्ष असल्याने समाजबांधवामध्ये रथोत्सवाबद्दल मोठा उत्साह दिसून आला. दरम्यान या मिरवणुकीत श्री दत्तात्रय शक्ती लेझीम संघाच्यावतीने बहारदार लेझीमचा डाव सादर करण्यात आले. तसेच विविध विवेकानंद शक्तिप्रयोग मंडळाने अंगावर शहारे आणणारे शक्तीप्रयोग सादर करून लक्ष वेधून घेतले काही मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले होते. त्यामध्ये शिवलिंग महादेव प्रतिमा मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डिजेचा समावेश होता. डॉल्बीच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता,अनेक मंडळांनी आकर्षक देखावा सादर करून लक्ष वेधून घेतले. विविध डान्स ग्रुपने तेलुगू, हिंदी आणि मराठी गाण्यांवर आपली नृत्य कला सादर केली. मिरवणूक मार्गावर जय मार्कंडेयचा जयघोष करण्यात येत होता.ही मिरवणूक मार्कंडेय मंदिर येथून निघून भारतीय चौक,रत्नमारुती चौक,जमखंडी पूल,पदमशाली चौक,दत्त नगर,मार्कंडेय रुग्णालय,जोडबसवण्णा चौक,राजेंद्र चौक,बुलाभाई चौक,कन्ना चौक,उद्योग बँक,साखर पेठ,गुरुवार पेठ, समाचार चौक,माणिक चौक ,विजापूर वेस मार्गे मार्कंडेय मंदिर येथे समारोप करण्यात आला.मिरवणुकीत भिक्षपती कंदीकटला आणि यशोदा कंदीकटला यांनी पारंपरिक हातमागावर दिवसभर वस्त्र विणून रात्री तयार झालेले वस्त्र श्री मार्कंडेय महामुनींच्या चरणी अर्पण करून आपली सेवा बजावली. घोंगडे वस्ती प्रतिष्ठान,राडा बॉईज,संयुक्त हिंदूत्व साम्राज्य,यु. के बहुद्देशिय सामाजिक संस्था,आदर्श नवरात्र महोत्सव मंडळ,श्री विवेकानंद शक्तीप्रयोग तरुण मंडळ,श्री प्रतिष्ठान,पदमयुग प्रतिष्ठान,एस एस प्रतिष्ठान,मार्कंडेय युवा प्रतिष्ठान,जय मार्कंडेय बहुद्देशिय सामाजिक संस्था जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ,पदम जल्लोष,श्री ओम साई प्रतिष्ठान,जयभवानी प्रतिष्ठान,हिंदू साम्राज्य,मातृ भूमी मित्र मंडळ,रावण साम्राज्य सामाजिक संस्था,महात्मा गांधी विणकर मित्र मंडळ,जय पदमशाली प्रतिष्ठान,एसपी अण्णा ग्रुप,बजरंग सेना, हिंदू बॉईज सामाजिक संस्था,श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ,रुद्राक्ष प्रतिष्ठान,श्री साई गणेश मित्र मंडळ,घरकुल प्रतिष्ठान,दत्तात्रय लेझीम संघ या मंडळांनी सहभाग घेतला होता.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...