भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात अज्ञात चोरट्यानी गुरुनानक नगर येथील सिंधुताई महिला नागरी पतसंस्था सहकारी बँकेच्या शटरचे कुलूप व कँश रुमचे ड्रॉप तोडुन बँकेमध्ये आत प्रवेश करुन तिजोरीतील १० लक्ष ३३ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. तुमसर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही. आता या बँक चोरी प्रकरणात पोलिस काय भूमिका घेते व चोरांना कधी जेरबंद करते ते पाहण्यासारख असेल.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...