सामाजिक उपक्रमातून समाज संघटित करणाऱ्या चंद्रनील सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. ७) ऐतिहासिक मंगळवार पेठ पोलिस चौकीसमोर येथे दहीहंडीचा नयनरम्य सोहळा रंगणार आहे. ३० फुटी मनोरा तयार करून भारतीय वैज्ञानिकांच्या समर्थनार्थ चंद्रयान-३ ची प्रतिकृती साकारली जाणार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्यानिमित्ताने वडार समाजाच्या वतीने १०० वर्षांची परंपरा आजही अविरतपणे सुरु आहे. ह.भ.प. लक्ष्मण महाराजांनी नगर प्रदक्षिणेची परंपरा सुरु केली आणि ती परंपरा चंद्रनील फाउंडेशनने जतन केली आहे. सोलापूर शहरात दहीहंडी फोडण्याचा मान बाळीवेस येथील वडार समाज बांधवांना आहे. दहीहंडी उत्सवाची सुरवात वडार समाज भजनी मंडळाच्या सप्ताहाने होते.