मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये आंदोलन केले जात आहे या आंदोलनाला गालबोट लागले असून आंदोलनकर्ते मराठा समाजावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केल्यानंतर राज्यांमध्ये सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात देखील सदरच्या घटनेचे पडसाद उमटत आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर पुणे महामार्गावर टायर जाळून रास्तारोको करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे राम जाधव यांनी अधिक माहिती देताना निष्क्रिय सरकारवर ताशेरे ओढले. तत्पूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मराठा समाज बांधवांनी पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत विविध घोषणा दिल्या.