जालना येथील मराठा समाजावर पोलिसांच्या वतीने करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये अनेक महिला, लहान मुलं, वृद्ध पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जखमी झाल्यामुळे अकोलेकाटी येथील मराठा समाज महाराष्ट्र सरकारचा निषेधार्थ बार्शी – सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला.याशिवाय बार्शी टोलनाक्यावरही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती.
अकोलेकाटी येथील बार्शी – सोलापूर रस्त्यावर येथे मराठा समाज बांधव एकत्र येऊन शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उत्तर सोलापूर तालुका पोलीस स्टेशन ठाण्याचे वतीने चोख बंदोबस्त होता. मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन आयोजक सरपंच अंजली क्षीरसागर यांनी पोलिसांना दिले.