पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.०० वाजता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पीएम स्कील रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पीएम स्कील रन कार्यक्रम कौशल्य, रोजगार, उद्योजगकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मार्फत पीएम स्कील रन राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व शासकीय व अशासकीय शाळा व महाविद्यालयातील वय वर्षे १६ वयोगटावरील सर्व स्त्री व पुरुष गटातील प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिक देण्यात येणार आहे. वय वर्षे १६ वयोगटावरील सर्व स्त्री व पुरुष पीएम स्कील रन कार्यक्रमात सहभाग घेवू शकतात.
सहभाग घेण्याकरिता जवळील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तेथील समन्वक यांच्याशी संपर्क करुन सर्व उमेदवारांनी नोंदणी करुन घ्यावी. तसेच सहभाग घेतल्यावर उमेदवारांना डिजिटल प्रमाणपत्र त्यांना ई-मेलव्दारे प्राप्त होईल, असे ठाणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेश शालीग्राम जाधव यांनी कळविले आहे.