घाटकोपर असल्फा परिसरामध्ये गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. यात भरधाव कारने ३ ते ४ जणांना उडवले आहे. घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती पुढे चालत जात असणाऱ्या ३ ते ४ जणांना धडकली. त्यानंतर ती पुलाच्या कठड्यावर अडकली.
गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील पुलाचे काम रखडले आहे. मुंबई महापालिकेने तो धोकादायक असल्याचेही जाहीर केले आहे. मात्र तरी देखील महापालिकेकडून या संदर्भात अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान पुलावर सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.