व्यावसायिक (कमर्शिअल) एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २०९ रुपयांनी वाढ झाली आहे. कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत वाढून आता १,७३१.५० रुपये झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका लागला आहे. ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात दसरा, नवरात्र असे सण साजरे केले जाणार आहेत. या दरम्यान ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी रविवारी कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची किंमत २०९ रुपयांनी वाढवली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १,७३१.५० रुपयांना विकला जात आहे. दिल्लीसोबतच कोलकता, चेन्नई या ठिकाणी ही दरवाढ लागू झाली आहे. कोलकाता येथे व्यावसायिक गॅस सिलिंडर १,८३९.५० रुपये, मुंबईत १,६८४ रुपये, तर चेन्नईत १,८९८ रुपयांना विकला जाणार आहे.
या आधी सप्टेंबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती १५७ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.