डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, मोहोळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, नगरपरिषद, सेवाभावी संस्था व विविध राजकीय पक्ष यांच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या माध्यमातून ओला व सुका असा मिळून सुमारे दीडशे टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात येते. त्या निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील गावोगावची विविध देवतांची मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, मस्जिद, दर्गे, पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालये, साखर कारखाने परिसर, गावांतर्गत रस्ते, विविध चौक या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत धर्माधिकारी प्रतिष्ठानचे गावोगावचे सदस्य ही सहभागी झाले होते, तर भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, आधी सह अन्य पक्षांचे पदाधिकारी ही सहभागी झाले होते. डम्पिंग ट्रॅक्टर, खोऱ्या, पाटी, झाडू व टिकाव हे साहित्य घेऊन सकाळी साडेनऊ वाजता स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली होती.