बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त एका शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बी-टाऊनचे स्टार्स सहभागी झाले होते. यादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये भाईजान त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीला किस करताना दिसत आहे. ब्लू शिमर ड्रेसमध्ये संगीता खूपच सुंदर दिसत आहे. सलमान खान त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीला कारपर्यंत बाहेर सोडण्यासाठी आला होता, यादरम्यान सलमान संगीताला मिठी मारताना आणि कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. एकेकाळी सलमान खान आणि संगीता एकमेकांना डेट करायचे. मात्र, अनेक वर्षे टिकल्यानंतर हे नाते तुटले.
सलमान खान आणि संगीता बिजलानी हे एकेकाळी बी-टाऊनचे सर्वात आवडते कपल मानले जायचे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या दोघांचे नाते जवळपास 10 वर्षे टिकले. अगदी सलमान खानने चित्रपट निर्माता करण जोहरच्या शोमध्ये कबूल केले की तो संगीता बिजलानीशी लग्न करणार आहे, ज्यासाठी लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. मात्र सलमान आणि सोमीच्या वाढत्या जवळीकांमुळे सलमान आणि संगीता यांचे ब्रेकअप झाले होते.मात्र, त्यानंतरही सलमान आणि संगीता अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडिया यूजर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘पहिले प्रेम नेहमीच पहिले असते’. तर आणखी एका युजरने लिहिले आहे, ‘माझे पहिले पहिले प्रेम’.