राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस पाटील पदासाठी भरती सुरू आहे. नुकतीच नाशिक जिल्ह्यातील पोलिस पाटील (Nashik Police Patil Bharti 2023) पदभरती जाहीर करण्यात आली. या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक उपविभागीय कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या गावांमधील एकूण ६६६ पोलिस पाटील पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. या पदांसाठीची तालुकानिहाय विभागणी, पात्रता, वयोमार्यादा आणि इतर सविस्तर माहिती पाहूया…
‘नाशिक पोलिस पाटील भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
मालेगाव उपविभाग – ६३ पदे
येवला उपविभाग – ६१ पदे
चांदवड उपविभाग – ५९ पदे
दिंडोरी उपविभाग – ११६ पदे.
बागलाण उपविभाग – ५७ पदे
नाशिक उपविभाग – २२ पदे.
निफाड उपविभाग – ६९ पदे
कलवण उपविभाग – ११९ पदे.
इगतपुरी- त्र्यंबकेश्वर उपविभाग- १०० पदे.
एकूण पदे – ६६६
पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा : २६ सप्टेंबर २०२३ पर्यंत किमान वय २५ आणि कमाल वय ४५ असावे.
काही अटी:
अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा.
अर्जदाराने शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, इतर ओळखपत्र, स्वयंघोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक.
अर्जदाराने अर्जामध्ये स्वत:चा ई-मेल व मोबाइल नंबर नमूद करणे अनिवार्य.
अर्जदार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक.
अर्जदारास दोनपेक्षा जास्त अपत्य नसावीत.
निवड पद्धती: या भरतीसाठी पात्र उमेदवारांची ८० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर २० गुणांची तोंडी परीक्षा होईल. या दोन्ही परीक्षांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. लेखी परीक्षेस १० वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतील. ज्यामध्ये सामान्यज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी आदि विषयांचा समावेश असेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज शुल्क: या भरतीकरिता खुल्या प्रवर्गास ६०० रुपये तर आरक्षित/आर्थिक घटक प्रवर्गासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ८ ऑक्टोबर २०२३ (सायंकाळी ५.४५ पर्यंत)