विठ्ठल नगरी पंढरपुरात पंढरपुरात आजपासून सर्वपक्षीय आमदार, खासदार मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नो एन्ट्री करण्यात आली आहे.मराठा आरक्षण मिळाल्यावरच प्रवेश दिला जाणार आहे.मराठा आरक्षण मिळाल्यावरच सर्व आमदार खासदार विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश मिळेल.विविध पक्षांच्या मराठा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदार राज्यात संवेदनशील होऊन गेला आहे. राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा वाढत चालला आहे. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून अनेक जिल्ह्यात सर्वपक्षीय नो एन्ट्री सुरु झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात 109 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशा आशयाचे फलक गावाच्या चौका चौकात लागलेले आहेत. लातूर जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये असे फलक दिसून येत आहेत.