संघ विचाराचा रेशमी कीडा त्यांच्या कानात आणि मनात वळवळत आहे. स्वागत आहे. एकनाथ शिंदे यापूर्वी संघ कार्यालयात कधीच का गेले नाहीत? त्यांचं पक्षांतर आणि रक्तांतर झालं आहे. रेशीम बागला जाणं चुकीचं नाही. हिंदुत्ववादी विचाराची संघटना आहे. दोघं जोड्याने जात असतील तर आनंद आहे. काही दिवसाने खाकी पँट घालून येतील त्यांचं स्वागत करू. आम्ही संघावर कधीच टीका केली नव्हती. पण इतक्या लवकर त्यांचं रक्तांतर झालं याचं आश्चर्य वाटतं. पक्षांतर केलं आता रक्तांतर झालं आहे.
शिंदे गटाचा बाप आला तरी शिवसेना भवनात घुसू शकत नाहीत.शिवसेना भवनावर ताबा मिळवण्याची भाषा करणाऱ्यांचे बाप आले पाहिजेत. त्यांचा एक बाप असेल तर येईल. शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार? सेनाभवन बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलं. सेना भवन आमचं होतं, आहे आणि राहणार.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...