किशोर पाटील यांनीच खंडोबा देवस्थानची ४२ एकर जमीन हडप केली असून देवस्थान पंच कमिटीवर निरर्थक आरोप केले आहेत, असा खुलासा चेअरमन विनय ढेपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. बाळे येथील श्री खंडोबा देवस्थानमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून चेअरमन विनय ढेपे यांचा मनमानी कारभार सुरू असून श्री खंडोबा देवाचा गाभारा दर्शन कायमस्वरूपी खुले करावे, देवस्थानमध्ये भाविकांसाठी स्नानगृहाची सोय करावी, लग्न, मुंज आदी विधिवत कार्य चालू करावे, हक्कदार पुजाऱ्यांना विश्वासात न घेता केलेला जमिनीचा व्यवहार रद्द करून काढलेली रक्कम श्री खंडोबा देवस्थानच्या खात्यात जमा करावी, सर्व हक्कदार पुजाऱ्यांना विश्वासात घेऊन कारभार करावा आदी विविध मागण्यांसाठी खंडोबा मंदिर येथे अजिंक्य पुजारी व मानकरी किशोर पाटील यांनी आंदोलन केले होते.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...