कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत २९ फेब्रुवारीपर्यंत नियोजन करण्यात आले आहे. शेतीसाठी पहिले आवर्तन १४ डिसेंबरपर्यंत तर दुसरे आवर्तन १ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी आजूबाजूच्या परिसरातील वीज खंडित करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची आज बैठक पार पडली. दृश्यप्रणालीव्दारे आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, समाधान आवताडे, सुभाष देशमुख, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...