महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सर्व गावांमधील पाणीपुरवठा योजनेची कामे माहे जानेवारी 2024 अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलजीवन मिशनच्या कामाच्या आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पी. व्ही. पाटील, तसेच पाणीपुरवठा विभागाचे सर्व उपअभियंता व गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी याबाबत बोलताना सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती असून जलजीवन मिशन अंतर्गत ज्या पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत ती कामे डिसेंबर 2023 पर्यंत तर सुरू असलेली कामे जानेवारी 2024 अखेरपर्यंत पूर्ण करावीत. संबंधित ठेकेदाराला बोलावून घेऊन पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत. मजुरांची संख्या कमी असेल तर ठेकेदारांनी मजुरांच्या संख्येत वाढ करून दोन शिफ्ट मध्ये हे कामे पूर्ण करून घेण्याचे नियोजन करावे व कोणत्याही परिस्थितीत विहित वेळेत काम पूर्ण होईल यासाठी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...